पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये लावण्यात येणार आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही करण्यात आले आहे. यामुळे पेपर तपासणीच्या कामावर त्याचा परिणाम झाला होता. आता मात्र उत्तरपत्रिका तपासणी व सबमिशनची कामे वेगाने पूर्ण होऊ लागली आहेत. निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
15 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्ये पूर्ण करून सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरू करता येणार आहेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरू करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
0 Comments